यवतमाळ हादरले; एका रात्रीत १९ जण कोरोना पॉझिटिव्ह

    दिनांक :25-Apr-2020
|
 
corona positive_1 &n
 
 
यवतमाळ, 
जगभरात दहशत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींनी देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन घोषित केले आहे. मात्र, यवतमाळमध्ये  लॉकडाऊनमध्येही एका रात्रीत तब्बल कोरोनाग्रस्तांची संख्या दुप्पट झाल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारी एकाच दिवशी कोरोनाचे नऊ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शुक्रवारी दुपारी १२ पासून सोमवारी मध्यरात्री १२ पर्यंत असे चार दिवस सलग शहर कडकडीत बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहे. मात्र, तरीही जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे.
  
यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षामध्ये भरती असलेल्या १९ जणांचे अहवाल 'पॉझिटिव्ह' आल्यामुळे आता कोरोना रुग्णांची संख्या एकूण ३४ वर पोहचली आहे. या सर्व व्यक्ती, भरती असलेल्या कोरोना ग्रस्तांच्या थेट संपर्कात आल्या होत्या. तसेच त्यांच्याच तीन कुटुंबांतील सदस्यांचा यात समावेश आहे. हे सर्व रुग्ण यवतमाळ शहरातील 'तबलिगी' प्रभावक्षेत्रातीलच आहेत, हे उल्लेखनीय. 
 
नव्याने पॉझिटिव्ह आलेले हे रुग्णही काही दिवसांपासून विलगीकरण कक्षामध्ये भरती आहेत. त्यांचे अहवाल वैद्यकीय महाविद्यालयाला आजच प्राप्त झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.