लॉकडाऊनमध्ये MTD ची अभिनव योजना

    दिनांक :25-Apr-2020
|
- अक्षय्य तृतीयेचा मुहूर्तसधण्यासाठी
 
 
mtd_1  H x W: 0
 
तभा वृत्तसेवा
वर्धा,
देशभरात कोरोनामुळे सोन्या, चांदीची सर्व दुकानं बंद आहेत. साडेतीन मुहूर्तापैकी अक्षय्य तृतीयेला सोने खरेदीला खूप महत्त्व आहे. मात्र, कोरोनामुळे अक्षय तृतीयेला सोने खरेदीदारांची गैरसोय होऊ नये यासाठी येथील मनोहर तुकाराम ढोमने ज्वेलर्सच्या वतीने 'आता बुक करा, पैसे भरा आणि लॉकडाऊन संपल्यानंतर सोन्याची डिलिव्हरी मिळणार', अशी सुविधा उपलब्ध करून खरेदीवर सूटही देण्यात आली आहे.
 
 
अक्षय तृतीया म्हणजे सोनेखरेदीचा सर्वोत्तम मुहूर्त!
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी असलेल्या लॉकडाऊनमुळे या शुभमुहुर्ताला आपली सोने खरेदीची परंपरा खंडित होऊ नये या उद्देशाने हवे असलेले सोने, आजच्या भावात बुक करू शकता. यासाठी आपल्याला हवे असलेले सोन्याची 80% रक्कम दुकानाच्या बँक खात्यावर ऑनलाईन जमा करावी लागेल. जर 22kt ज्वेलरी बुक केल्यास दागिन्यांच्या मजुरीवर 10% ची सवलतही देण्यात आली आहे. ऑफर लॉकडाऊन असेपर्यंत असेल, दुकाने उघडल्यानंतर आपण बूक केलेले सोने किंवा दागिने देण्यात येईल असे ढोमने यांनी सांगितले. खबरदारी म्हणून सर्व व्यवहार फक्त फाेन आणि बँकेमार्फत करण्यात येणार येतील, असे ते म्हणाले.