गावठी दारूसह एक लाखाचा मुद्देमाल जप्त

    दिनांक :25-Apr-2020
|
- परतवाडा पोलिसांची कामगिरी
 
One lakh items confiscate 
 
 
तभा वृत्तसेवा
अचलपूर,
लॉकडाऊन असतांना सुद्धा अवैधरीत्या मध्यप्रदेशातून परतवाडा शहरात गावठी दारू विक्रीला आणणार्‍या 4 लोकांसह दोन मोटर सायकल, मोबाईल, 95 लिटर गावठी दारू, असा मुद्देमाल अंबिका लॉनजवळ पोलिसांनी ताब्यात घेतला.
 
 
प्राप्त माहिती नुसार , मध्य प्रदेशातील खामला गावातील काही लोक ऐवधरीत्या गावठी दारू परतवाडा शहरात विक्रीस आणत असल्याची खात्रीदायक खबर्‍याकडून माहिती मिळताच ठाणेदार सदानंद वानखडे यांनी नेमलेल्या पथकाने धारणी रोडवरील अंबिका लॉन जवळील पाईंटवर नाकाबंदी करीत 95 लिटर दारुसह एक लाख नऊ हजाराचा माल जप्त केला. तसेच आरोपी अंबादास तेजीलाल कोगे, 26 वर्ष, संतोश ना. कोगे, 32, रवी ना. कोगे, 30 , देवीदास बच्चू गाठे 36 वर्ष रा. खामला जि. बैतुल, मध्यप्रदेश यांना अटक केली. सदर कारवाई ठाणेदार सदानंद मानकर यांच्या मार्गदर्शनात शिवा आठवले, मनोज पंडीत, अमोल वाढोनकर , निलेश वानखडे यांनी यशस्वीपणे पार पाडली.