वर्धेत दीप लावून परशुराम जयंती

    दिनांक :25-Apr-2020
|
- घरोघरी परशुराम चालीसा पठण
 

dive_1  H x W:  
 
वर्धा,
वर्धा जिल्हा ब्राह्मण संघटना, युवा ब्राह्मण संघटना, हिंदी ब्राह्मण संघटनाच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरोघरी आज शनिवार २५ रोजी सायंकाळी दिवे लावून, परशुराम चालीसाचे पठण करण्यात आले.
 
 
जिल्ह्यात दरवर्षी परशुराम जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. स्थानिक गोल बाजार येथे युवा ब्राह्मण संघटनेच्या वतीने परशुराम जयंती निमित्त शोभायात्रा, सामूहिक परशुराम चालीसा पठण कार्यक्रम करण्यात येतो. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरी राहूनच परशुराम चालीसा पठण, आरती करण्याचे आवाहन करण्यात आले होते. हिंदी भाषिक ब्राह्मण समुदायानेही घरीच परशुराम जयंती करण्याचे आवाहन करण्यात आले होते. हिंदी भाषिक समुदायकडून दरवर्षी बालाजी मंदिरातून शोभायात्रा काढण्यात येत होती. या वर्षी ती रद्द करण्यात आली. जोशी चॅट भांडरचे गोपाल जोशी यांनी आपल्या घरापुढे, दुकानापुढे दिवे लावून परशुराम जयंती साजरी केली.
 
 
वर्धा ब्राह्मण संघटनेचे विलास कुलकर्णी, युवा ब्राह्मणचे शैलेश देहाडराय, मेघजीत वझे, अमोल जोशी, मदन काळे, आकाश पत्की, अतुल देशपांडे यांनी आपल्या घरी दिवे, परशुराम चालीसाचे पठण केले. विशेष म्हणजे परशुराम चालिसा, आरती चे व्हाट्सआपवर टाकण्यात आले.