दुकानदार व मास्क न घालणार्‍यांना दंड

    दिनांक :25-Apr-2020
|
- पथ्रोटमध्ये तालुका प्रशासनाची कारवाई 

pathrot news_1   
 
 
तभा वृत्तसेवा
पथ्रोट,
परवानगी नसता दुकान उघडणे, तसेच परवानगी असलेल्या दुकानदारांकडून सोशल डिस्टन्सिंग न पाळणे आणि मास्क न घालणारे व्यक्ती, अशा सर्वांवर शनिवारी तालुका प्रशासनाकडून कारवाई करण्यात येऊन एकूण 3400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
 
 
कोरोना महामारीचे संकट सर्वत्र घोंगावत असल्याने प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केले आहे. अत्यावश्यक जीवनोपयोगी दुकाने उघडण्यास परवानगी असताना शनिवारी पथ्रोट येथे मानेकर ज्वेलर्सचे दुकान उघडल्याचे स्थानिक पत्रकारांच्या निदर्शनास येताच त्यांनी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीसह तालुका दंडाधिकार्‍यांना कळविले. याची दखल घेत तालुका दंडाधिकार्‍यांनी नायब तहसीलदार एस. एम. श्रीराव यांच्या नेतृत्वात मंडल अधिकारी विजय पुरी, तलाठी देवकते, आर. जे. वैद्य, ग्रामविकास अधिकारी हर्षदा बोंडे या पथकाला पाठविले. पथकाने मानेकर ज्वेलर्ससह मास्क न घालणे व सोशल डिस्टन्स न पाळणार्‍या अन्य दुकानदारांवर कारवाई केली.
 
प्रताप किराणा, आशीर्वाद किराणा, आकाश किराणा, या दुकानांच्या मालकांकडून प्रत्येकी दोन हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. सोबत तोंडाला मास्क न लावता विणाकारण फिरणार्‍यांवर स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीकडून ग्रां. पंचायत कर्मचारी राहुल ऊके यांनी दंडात्मक कारवाई करीत 1400 रू. दंड वसूल केला. अमरावती येथील कोरोना विषाणुचे पॉझिटिव्ह अहवाल आले असता आणखी सहा रुग्ण वाढल्याच्या पार्श्वभूमीवर अचलपूर उपविभागीय अधिकारी संदीप अपार यांनी कारवाईचे कडक निर्देश दिले आहेत.