सेवानिवृत्त शिक्षकांचे वेतन त्वरीत द्या

    दिनांक :25-Apr-2020
|
- मुख्य सचिवांना कुळकर्णी यांचे निवेदन

sachin kulkarni_1 &n 
 
मंगरुळनाथ,
कोरोना संकट व वयोवृद्धाचा विचार करता, सेवानिवृत्त शिक्षक आणि कुटुंब निवृत्ती धारकांच्या खात्यात मार्च महिनाचे निवृत्तीवेतन तात्काळ जमा करून त्यांच्या पर्यंत सुलभतेने पोहोचविण्याची मागणी राज्याचे मुख्यसचिव अजय मेहता यांच्याकडे लिखित स्वरूपात जलहक्क कार्यकर्ते सचिन कुळकर्णी यांनी केली आहे.
 
 
कोरोना संकटात जागतिक आरोग्य संघटनासह सर्व प्रशासन वयोवृद्ध नागरिकांची काळजी घेण्याचे आवाहन करीत आहे. म्हणून त्यांना तशा सुविधा उपलब्ध होणे अत्यावश्यक आहे. आयुष्यभर प्रामाणिकपणे सेवार्थ राहिल्याने अनेक सेवानिवृत्त शिक्षकांचेकडे उत्पन्नाचे इतर स्रोत नाहीत. अनेक सेवानिवृत्त शिक्षकांची किंवा त्यांच्या कुटुंबांची आर्थिक परवड होताना दिसत आहे. हे सर्व वयाची पासष्टी ओलांडलेले नागरिक आहेत. अनेकजण विविध आजाराने ग्रस्त असून त्यांना नियमित खर्चिक औषधोपचार करावा लागतो. वयोवृद्ध असल्याने कोरोनाच्या महामारीत सहजगत्या लक्ष्य होऊ शकल्याने घराबाहेर निघणे अशक्य व चुकीचे आहे. हा वर्ग सेवानिवृत्त कर्मचारी असल्याने ह्यांना शासकीय मदत सुद्धा मिळत नाही.
 
 
शासन नियमानुसार दरमहाच्या पाच तारखेच्या आधी सेवानिवृत्ती वेतन व्हायला पाहिजे. परंतू, 20 दिवस उलटूनही अजून वाशीम जिप च्या काहीच हालचाली नाहीत. जि.प. अंतर्गत अंदाजे 2 हजार आठशे निवृत्ती धारक आहेत. तरी ह्या वयोवृद्धांच्या हक्काचे सेवानिवृत्त वेतन तात्काळ अदा करण्याचे आदेश दयावे. अशी मागणी निवेदनाद्वारे कुळकर्णी ह्यांनी केली आहे.