खोलापुरी व नागपुरी गेट भागात रुटमार्च

    दिनांक :25-Apr-2020
|
- पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
 

rootmarch_1  H  
 
 
तभा वृत्तसेवा 
अमरावती,
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे आज शनिवारी शहरातल्या नागपुरी गेट व खोलापुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी रुटमार्च केला. दोन्ही ठाण्याच्या हद्दीतला निम्मा परिसर कन्टेटमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे.
 
 
अमरावती शहरात आतापर्यंत 19 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 18 रुग्ण उपरोक्त दोन्ही पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आहे. रुग्ण आढलेला परिसर केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या निकषांनुसार कन्टेटमेंट झोन म्हणून मनपा आयुक्तांनी घोषित केला आहे. त्या अनुषंगाने या बाधित क्षेत्रात शनिवारी पोलिस आयुक्त बावीस्कर, उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पठाण चौक, चाराबाजार, नुराणी चौक, बाबा चौक, हैदरपुरा, रहमतनगर, अलिमनगर, छज्ञयानगर, कमेला ग्राऊंड, पठाण चौक मार्ग खोलापुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दतही पोलिसांनी रुटमार्च केला. या रुटमार्च मध्ये नागपुरी गेटचे ठाणेदार अर्जुन ठोसरे, संजय जव्हेरी, राहुल जाधव, पीएसआय मोहोड, प्रशांत लभाणे, पुरुषोत्तम ठाकरे, अयुब शेख तसेच पोलिस निरीक्षक निलिमा अरज, पुंडकर, घारपांडे, पीएसआय कोल्हे, मापारी, बाबरेकर, हनवंते यांनी व पोलिस कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला.