भोजनदान ही मदत नसून सेवा : आ. बंटी भांगडिया

    दिनांक :25-Apr-2020
|
- चिमूर येथील ‘कम्युनिटी किचन’ला तहसीलदारांची भेट 

bunty bhangadiya_1 & 
 
तभा वृत्तसेवा
चिमूर,
भोजनदान ही मदत नसून सेवा आहे. ही सेवा करण्याची संधी प्रत्येकाच्या नशिबात नसते. मी व माझा परिवार खुप भाग्यशाली आहोत की, आम्हाला अशी संधी प्राप्त झाली, असे प्रतिपादन आमदार बंटी भांगडिया यांनी केले.
 
 
टाळेबंदीदरम्यान मजुरांच्या जेवणाची सोय व्हावी, यासाठी बंटी भांगडिया यांनी सुरू केलेल्या चिमूर येथील ‘कम्युनिटी किचन’ला चिमूरचे तहसीलदार संजय नागटीळक यांनी शनिवारी भेट दिली. यावेळी भांगडिया बोलत होते. याप्रसंगी अप्पर तहसीलदार परिक्षित पाटील उपस्थित होते.
 
 
देशात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जनतेच्या सुरक्षिततेसाठी व आरोग्याची जाणीव ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात 3 मेपर्यंत टाळेबंदी केली आहे. त्यामुळे दैनंदिन मजुरीच्या आधारावर कुटुंब चालविणार्‍या मजुरांवर खूप मोठे संकट कोसळले आहे. त्यामुळे चिमूर विधानसभा क्षेत्रात नागभीड, चिमूर, भिसी, नेरी व इतर मोठ्या लोकवस्ती असणार्‍या ठिकाणी भांगडीया यांनी ‘कम्युनिटी किचन’ सुरू केले आहे. या किचनच्या माध्यमातून सकाळी व सायंकाळी 30 ते 35 हजार मजूर जेवण करतात व चिमूर मोठी लोकसंख्या असलेले ठिकाण असल्याने येथे भांगडिया यांच्या सहकार्याने घरपोच भोजन व्यवस्था केली जात आहे. मजुरांना व गरजू कुटुंबाना उत्तम भोजन मिळावे म्हणून भांगडिया जातीने लक्ष देऊन प्रत्येक ‘कम्युनिटी किचन’ला भेट देऊन सहकार्य करणार्‍या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करतात.
 
 
यावेळी भांगडिया यांनी, ‘कम्युनिटी किचन’ला मदत करणारे व भोजनदान उपक्रम यशस्वीपणे पार पाडत असलेल्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे आभार मानले. यावेळी राजु देवतळे, कमल असावा, सचिन फरकाडे, संजय कुंभारे, हरीश पिसे, अरुण लोहकरे, अजय शिरभय्ये उपस्थित होते.