उज्वला योजनेचे सिलेंडर शेवटच्या घरापर्यंत पोहोचविणार : चितलांगे

    दिनांक :25-Apr-2020
|
 
pmuy_1  H x W:  
 
 
मंगरुळनाथ,
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत सर्व उज्वला सिलेंडर सब्सिडीचे पैसे ग्राहकांच्या खात्यामध्ये जमा झाले असून, ज्या ग्राहकांनी उज्वला सिलेंडर चा लाभ घेतला नसेल त्यांनी 30 एप्रिल पर्यंत सिलेंडर बुक करून घ्यावे, असे आवाहन चितलांगे इण्डेन चे संचालक पुरुषोत्तम चितलांगे यांनी केले आहे.
 

pmuy_1  H x W:  
 
उज्वला योजनेच्या प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यातून एका सिलेंडर ची रक्कम केंद्र शासनाकडून जमाा करण्यात आली आहे. त्यामुळे एप्रिल अखेर एक सिलेंडर चा उचल करणे आवश्यक आहे. जर एप्रिल चे सिलेंडर बुक न केल्यास ग्राहकांना मे व जुनचे पैसे खात्यामध्ये येणार नाहीत. तालुक्यातील शेवटच्या गावापर्यंत लाभाथ्यापर्यंत या योजनेचा लाभ मिळावा याकरिता चितलांगे इण्डेन संचालक व त्याचे कर्मचारी डिलिव्हरी मॅन प्रयत्न करीत आहेत. सिलेंडर चा कोणताही तुडवडा नसल्यामुळे त्वरित एकाच दिवसात सिलेंडर देण्याचा प्रयत्न असल्याचे चितलांगे यांनी सांगीतले.