आग्रा येथून आलेले 'ते' तिघे पुन्हा गायब

    दिनांक :25-Apr-2020
|

taj mahal_1  H  
 
 
हिंगणघाट,
शहरातील गोमाजी वार्ड येथील भाडेकरु म्हणुन राहणारे मुळचे आग्रा येथील तीन व्यक्ती लाॅकडाऊननंतर आपल्या गांवी स्वतःच्या अक्टिवासह निघून गेले. काही दिवसांनी पुन्हा परत शहरात अवतरले असता आज २५ रोजी सकाळी नागरीकांच्या तक्रारीवरुन त्यांना ताब्यात घेण्यासाठी नगरपालीका अधिकारी पोचले असता ते तिघे फरार झाल्याची माहिती मिळाल्याने परिसरात दहशत पसरली आहे.
 
 
या प्रकरणी घरमालक व कुटुंबियांना होम क्वाॅरन्टाईन करण्यात आल्याची माहिती नगरपरीषदे प्रसासनाने दिली. फरार इसम हे मागिल दोन वर्षापासुन गोमाजी वार्ड येथे भाडयाने राहात होते, त्यांचा व्यवसाय काच विक्रीचा असल्याची माहिती मिळाली असुन ते लाॅकडाऊन नंतर आग्रा येथे स्वगांवी गेल्यानंतर पुन्हा हिंगणघाट येथे तीन दिवसांपूर्वी परतले.
 
 
स्थानिक नागरीकांनी प्रशासनाला कळविल्यानंतर नगरपालिकेची चमु वैद्यकीय अधिकाऱ्यासह घटनास्थळी चौकशीकरीता आले. माहिती घेतली असता तिघे युवक फरार झाल्याचे लक्षात आले, त्यांचे भ्रमणध्वणीसुद्धा बंद असल्याचे आढळले. चमुने घरमालक व त्याचे कुटुंबियांना दक्षता म्हणुन होम क्वारंटाईन चे आदेश दिले. फरार इसमाचे निवासस्थान व तेथे असलेले आटाचक्की केंद्र सुध्दा सिल करण्यात आले.