जनावरे नेणार्‍या वाहनाची ग्रामस्थांकडून तोडफोड

    दिनांक :25-Apr-2020
|
वडनेर भुजंग येथील घटना
 
 
Villagers vandalize a veh
 
तभा वृत्तसेवा
पथ्रोट,
8 जनावरे कोंबून नेणार्‍या एका वाहनाला पकडून त्यातील आरोपी व जनावरे पोलिसांच्या ताब्यात देऊन नंतर ग्रामस्थांनी वाहनाची तोडफोड केल्याची घटना वडनेर भुजंग येथे रात्रीच्या सुमारास घडली.
 
 
शुक्रवारी मध्यरात्री पथ्रोट पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्‍या वडनेर भुजंग येथे एक गाय, वासरू, म्हैस व वगारी कोंबून जात असलेले टाटा एस वाहन गावकर्‍यांनी पकडले. वार्ड.क्र. 1 मधील अविनाश घोम यांच्या घरासमोर हे वाहन ग्रामस्थांनी थांबवून पथ्रोट पोलिसांना फोनवर सुचित केले. दुय्यम ठाणेदार शिवशंकर खेडेकर यांनी तडकाफडकी घटनास्थळ गाठून एकूण 8 जनावरे व टाटा एस वाहनासह वाहन चालकास व अन्य एकास ताब्यात घेतले. मात्र त्यांचे सहकारी पळून गेले. त्यानंतर या वाहनाची ग्रामस्थांनी तोडफोड केली. त्यांच्यासोबत असलेल्या दुचाकीवरील हारुन व इतर पळून जाण्यात यशस्वी झाले. सदर जनावरे कत्तलीकरिता जात असल्याची माहिती आहे. घटनेची फिर्याद दुय्यम ठाणेदार शिवशंकर खेडेकर यांनी नोंदवली आहे.