अनैतिक संबंधातून युवकाची दगडाने ठेचून हत्या

    दिनांक :25-Apr-2020
|
 

murder _1  H x  
 
(अल्लीपूर) वर्धा,
हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपुर येथे अनैतीक संबंधातून दगडाने ठेचून एका युवकाचा निर्घृण खून केल्याची घटना आज शनिवारी सकाळी घडली. हमीद पठान असे मृतक युवकाचे नाव आहे.
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, अल्लीपूर येथील यशवंत शाळेच्या मागच्या परिसरात राहणाऱ्या वसंता आत्राम (32) याच्या घरालगत एका ईसमाचा खून झाला असल्याची माहिती मिळताच अल्लीपूरचे पोलिस निरीक्षक योगेश कामाले पथकासह घटनास्थळी पोहचले. त्यांनी तात्काळ खून झालेला संपूर्ण परिसर सिल करून घेतला.
 
 
दरम्यान, मृतक हमीद पठाण काही वर्षापासून अमित पठाण हा अल्लीपूर सोडून समुद्रपूर तालुक्यात पत्नीसह गेला होता. मात्र, अल्लीपूर येथे त्याचे येणे-जाणे सुरू होते. काल देखील तो अल्लीपूर येथील आपल्या भावाच्या घरी आला होता. वसंत आत्राम यांच्या घराजवळ त्याचा खून करण्यात आला. आरोपी वसंत आत्राम याचा व मृतकाचा वाद झाला. वादात वसंत आत्राम याने हमीद पठान याची डोक्यावर दगडाने ठेचून हत्या केली. या प्रकरणी आरोपी वसंत आत्राम फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे.