सर्वसामान्यांची आवडती लालपरी महिनाभरापासून बंद

    दिनांक :25-Apr-2020
|
- कांरजा आगाराचे दिड कोटीचे नुकसान
 
  
st_1  H x W: 0
 
 
कारंजा लाड,
सर्वसामान्यांची आवडती लालपरी कोरोनामुळे सध्या बंद पडल्याने एरवी गर्दीने फुललेल्या कारंजा बसस्थानकावर मात्र सध्यपरिस्थितीत शुकशुकाट दिसून येत आहे. 22 मार्च पासून कारंजा आगाराची एसटी सेवा बंद झाली असून, महिनाभर्‍यात कारंजा आगाराचे जवळपास दिड कोटी रूपयांचे नुकसान झाले.
 
 
प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रिद घेऊन एसटी चा प्रवास सुरक्षित प्रवास असे सांगत एसटी च्या माध्यमातून दरदिवशी लाखो प्रवासी एका गावाहून दुसर्‍या गावात प्रवास करीत होते. परंतु अचानक कोरोनाने संपूर्ण देशासह राज्यात दस्तक दिली. आणि खबरदारीचा उपाय म्हणून सर्वसामान्यांना हवीहवीशी वाटणारी लालपरी बंद करण्यात आली. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाबंदी करण्यात आल्याने एका जिल्ह्यातून दुसाया जिल्ह्यात नागरिकांचे अवागमन होउन कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी एसटी सेवा बंद करण्यात आली आहे. एसटी सेवा बंद केल्याने सर्वसामान्यांचा प्रवास थांबला परिणामी महाराष्ट्रराज्य परिवहन महामंडळासह कारंजा आगाराला याचा मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला.
 
 
कोरोनापूर्वी कारंजा आगाराच्या 42 एसटी बसेस दरदिवशी रस्त्यावर धावत होत्या. प्रतिदिन होणार्‍या 214 फेर्‍याच्या माध्यमातून कारंजा आगाराला दरदिवशी 5 ते साडे 5 लाख रूपयाचा महसुल प्राप्त होत होता. 22 मार्चच्या जनता कर्फ्यू पासून कारंजा आगाराची बससेवा बंद करण्यात आल्याने 22 मार्च ते 22 एप्रिल या महिनाभरात आगाराचे जवळपास दिड कोटी रूपयाचे आर्थिक नुकसान झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.