सरसंघचालकांचा आज ऑनलाईन बौद्धिक वर्ग

    दिनांक :25-Apr-2020
|


mohanji bhagwat_1 &n
नागपूर,
कोरोना विषाणू या वैश्विक संकटाचा सामना करण्यासाठी संपूर्ण देश एकजुटीने प्रयत्न करीत आहे. या काळात भारताचे नेतृत्व आणि सामान्य नागरिकांचा प्रतिसाद जगापुढे अनुकरणीय ठरत आहे. यात रा. स्व. संघाचे स्वयंसेवक देखील समाजाच्या पाठीशी उभे राहून आपले महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत.
 
या पृष्ठभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूरतर्फे अक्षय्यतृतीयेच्या दिवशी म्हणजे रविवार 26 एप्रिल रोजी सायं. 5 वाजता ऑनलाईन बौद्धिक वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. यात सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे ‘विद्यमान परिस्थिती व आमची भूमिका’ या विषयावर उद्बोधन होणार आहे. याचे थेट प्रसारण यूट्युब  (youtube.com/rssorg), फेसबुक (facebook.com/rssorg) व https://www.tarunbharat.net/ वर  होणार आहे.