रोटरी क्लबतर्फे पीपीई कीट जिल्हाधिकार्‍यांना सुपूर्द

    दिनांक :25-Apr-2020
|

rotary_1  H x W 
 
 
तभा वृत्तसेवा
चंद्रपूर,
करोनाग्रस्त रुग्णांची तपासणी करीत असताना त्यांच्या संपर्कात येणारे डॉक्टर व इतर वैद्यकीय चमू यांच्या स्वसंरक्षणार्थ वापरण्यात येणारी पीपीई कीट चंद्रपूरच्या सर्व रोटरी क्लबद्वारा जिल्हाधिकार्‍यांच्या सुपूर्द करण्यात आली.
 
 
यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, शल्य चिकित्सक डॉ. राठोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, रोटरी क्लबचे वीरेंद्र हजारे, अरुण तिखे, प्रवीण पोशेट्टीवार, मधुसूदन रुंगठा, राम चांदे, सचिन गांगरेड्डीवार, संजय ठाकरे,उपगन्लावार, रिया उत्तरवार यांची उपस्थिती होती. चंद्रपूर जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण नसल्याने भविष्यकाळातील काळजी म्हणून रोटरी क्लबतर्फे पीपीई कीटचे वितरण करण्यात आले. याबद्दल संपूर्ण रोटरी क्लबकडून राजेंद्र भामरे यांचे आभार मानण्यात आले. तसेच सर्व अधिकार्‍यांनी रोटरी क्लबचे आभार मानले, अशी माहिती स्मिता ठाकरे, सचिव संदीप रामटेके यांनी कळविले.