यवतमाळमध्ये आणखी ७ जण कोरोना पॉझिटिव्ह

    दिनांक :26-Apr-2020
|
-एकूण रुग्णसंख्या ४१ 

yavatmal_1  H x 
 
यवतमाळ,
यवतमाळमध्ये संस्थात्मक विलगीकरणात भरती असलेल्या आणखी ७ जणांचे अहवाल आज 'पॉझिटिव्ह' आले आहेत. यामुळे आता यवतमाळ जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली असून एकूण ४१ वर पोहचली आहे. ही माहिती वैद्यकीय महाविद्यालयाला रविवारी कळविण्यात आली आहे.
 
आज पॉझिटिव्ह आलेल्या सातही जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे आता यवतमाळमधील कोरोनाबाधितांची संख्या आता ४१ झाली आहे. हे सर्व कोरोना रुग्ण येथील तबलिगी प्रभावक्षेत्रातीलच असल्याची माहिती आहे. सद्यस्थितित ३१७ संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी नागपूरला पाठविण्यात आले आहेत. तसेच, त्यांचे अहवाल अप्राप्त असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.