लॉकडाऊनच्या काळात गरीबांना मदतीचा हात

    दिनांक :26-Apr-2020
|
- सामाजिक कार्यकर्ते सपकाळ व डॉ. वाघमारे यांचा पुढाकार 

help_1  H x W:  
 
 
मंगरुळनाथ, 
कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे गेल्या सव्वीस दिवसांपासून लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे. अशा स्थितीत हाताला काम नसल्याने मजूर कुटुंबावर उपासमारीची वेळ ओढवली आहे. ही बाब लक्षात घेता एक हात मदतीचा म्हणून मंगरूळनाथ येथील समाजसेवक सौरभ सपकाळ यांनी स्वखर्चातून आतापर्यंत जवळपास 175 मजूर कुटुंबांना धान्य वाटप केलेले आहे.
 
 
तालुक्यातील 175 कुटुंबांना पाच किलो गहु, तीन किलो तांदुळ, एक किलो साखर, एक किलो तुर डाळ, अर्धा किलो तेल अशा स्वरुपाची मदत केली आहे. या उपक्रमात डॉ. प्रशांत वाघमारे, अजय गवारगुरु, अरुण खडसे, युवराज किरडे, अमित इंगोले, अनुप कांबळे, ओम ढोबळे, प्रफुल भेंडेकर, अक्षय इंगोले, निलेश निचळ, संदीप इंगळे, राजू मनवर व सर्व मित्र परिवाराच्या हस्ते धान्य वितरित करण्यात आले.