राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंगणघाट द्वारा अन्नछत्र

    दिनांक :26-Apr-2020
|

annachatra_1  H 
 
 
हिंगणघाट,
कोरोना महाभारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची घोषणा झाली आणि अचानक सगळ्यांच्या समोर अनेक प्रश्न निर्माण झाले. परप्रांतीय मजुरांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न उपस्थित झालेला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुढे आला. जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत व नगर संघचालक विजयसिंग मोहता यांच्या मार्गदर्शनात शेल्टर होम मध्ये निवासी असलेल्यानं करीता अन्नछत्राची स्थापना करण्यात आली. प्रारंभी 40 संख्येवरून सुरुवात सुरू झालेली ही अन्नछत्राची योजना पुढे ते अडीशे तीनशे पर्यंत येऊन पोहोचली. होती.
 
 
या लोकांच्या दोन्ही वेळच्या जेवण तयार करण्याचं कार्य नित्यनेमाने प्रारंभ झाले . याच काळात हिंगणघाट नगर व हिंगणघाट ग्रामीण भागातील गरजवंतांना १५ हजार रेशन किट वाटपाचे काम सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंगणघाट व मित्रपरिवार यांच्या माध्यमातून करण्यात आले.
 
 
दरम्यान, श्री. संत पैकाजी महाराज देवस्थान, सास्ताबाद तर्फे 10000 रुपये तसेच श्रीराम मंदिर ट्रष्ट 70000 रुपये अन्नछत्रासाठी जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत यांच्याकडे दिला.
 
 
चारशे साडेचारशे लोकांचा दररोजचा स्वयंपाक या माध्यमातून तयार व्हायला लागला निवासी असणारे लोक मजुरांच्या वस्त्या या विविध ठिकाणी त्यांना अन्न पुरवण्याचे काम नित्यनियमाने स्वयंसेवक करू लागला.
 
 
जिल्हा संघचालक राजपूत याना पुन्हा एक नवी समस्या जाणवली. हैदराबाद, सिकंदराबाद ठिकाणी राहणारा मजूर उद्योग बंद पडल्यामुळे आपल्या मूळ प्रदेशाकडे परत चाललेला होता. तोसुद्धा पायदळ मजुरांचे लोंढे रोज यायला लागले. यांच्या सुद्धा जेवणाची व्यवस्था केल्या गेली पाहिजे हा विचार त्यांच्या मनात आला आणि पुन्हा नव्याने दररोज सातशे ते आठशे लोकांचा स्वयंपाक नित्यनेमाने करायला प्रारंभ झाला. आतापावतो आठ ते दहा हजार लोकाना अन्नदान केले. उन्हातानात पायदळ येणारे हे सगळे मजुर, कामगार, कोणी उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड यासारख्या प्रदेशात आपल्या गावी आपल्या माणसांमध्ये मिळायला चाललेली होती. स्त्री, पुरुष लहान मुले ही सगळी त्यात होती. सहा महिन्याचे वर्षभराचा मुलं त्यांच्यासोबत होती. पुन्हा एकदा हिगणघाट वासियांचा दानशूरतेचा परिचय पाहायला मिळाला. समाजातील दानशूरांनी मोठ्या प्रमाणात वस्तू स्वरूपात रोख रकमेत तर काहींनी स्वतःच्या घरी अन्न तयार करून आणू लागलीत. विनय मोरे यांनी या सगळ्यांच्या औषधी ची व्यवस्था केली.
 
 
लहान मुलांसाठी दुधाची व्यवस्था करणारे, अनवाणी पायाने प्रवास करणाऱ्यांच्या करिता चपलांची मदत करणारे, याच कालावधीत वाढदिवसाचा खाऊ भेट वस्तू स्वरूपात या अन्नछत्रा मध्ये देण्याचा आग्रह आपल्या पालकांना करतानाचे लहान-लहान मुलं सुद्धा दिसली.