मंगरुळनाथ शहरातील गरजुंना भारत मुक्ती मोर्चाकडून धान्य वितरीत

    दिनांक :26-Apr-2020
|
 
help_1  H x W:
 
 
मंगरुळनाथ,
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देशात सर्वत्र संचारबंदी लागली आहे. त्यामुळे हातावर पोट घेऊन जगणार्‍यांची परवड होत आहे. त्यामुळे शहरात भारत मुक्ती मोर्चाचे संजय ढळे यांच्या नेतृत्वात गरजुंना कीराणा किटचे वितरत करण्यात आले.
 
 
देशात लॉकडाऊन असल्यामुळे गरीब जनतेचे अन्नावाचुन हाल होत आहेत. राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष संजय ढळे यांच्या नेतृत्वात प्रशासनाची पुर्वपरवानगी घेऊन व सुरक्षितता बाळगुन शहरामध्ये गरजुंना किराणा किट वितरीत करण्यात आल्या. यावेळी सिध्दार्थ मनवर, आकाश ठोंबरे, रवि चव्हाण यांचीही उपस्थिती होती.