अकोल्यात पुन्हा आढळला कोरोनाबाधित रुग्ण

    दिनांक :26-Apr-2020
|
- रुग्ण युवक सिंधी कॅम्पचा रहिवासी
 
akola _1  H x W 
 
अकोला,
गत सहा दिवसात एकही कोरोना बाधित रुग्ण न आढळल्याने जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरू असतानाच आज रविवारी शहरात आणखी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. सिंधी कॅम्प परिसरातील ४१ वर्षीय व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाने स्पष्ट केले. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी सकाळीच हा परिसर सील करण्यास सुरवात केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
 
 
रविवार, 26 एप्रिल रोजी सकाळी एकूण १२ अहवाल प्राप्त झाले असून, त्यापैकी११ अहवाल निगेटिव्ह आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या १७ वर पोहोचली असून, यातील एकाचा मृत्यू, तर एकाने आत्महत्या केली आहे. पातूर येथील सात जणांना कोरोनामुक्त करण्यात आले आहे. उर्वरीत आठ रुग्ण हे अकोला शहरातील आहेत.

पहिल्या रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह
शहरातील पहिल्या रुग्णाचा पाचवा आणि सहावा अहवाल निगेटिव्ह आला आहे मात्र या रुग्णाच्या परिवारातील अन्य सदस्यांचा अहवाल प्रलंबित आहे या प्रलंबित अहवालात तीन वर्षीय बालकाच्या अहवालाचाही समावेश आहे.