डॉक्टर आपल्या दारी उपक्रम अनुकरणीय : भावना गवळी

    दिनांक :26-Apr-2020
|

gavli_1  H x W: 
 
 
वाशीम,
भारतीय जैन संघटना वाशीम व फोर्सच्या वतीने जिल्ह्यात डॉक्टर आपल्या दारी या उपक्रमातून लोकांची तपासणी व मोफत औषधीचे वितरण करण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या काळात सदर उपक्रम हा अनुकरणीय असल्याचे प्रतिपादन खा. भावना गवळी यांनी केले.
 
 
स्थानिक जनशिक्षण संस्थान परिसरात डॉक्टर आपल्या दारी उपक्रमातर्ंगत महिला, पत्रकार व लोकांची तपासणी व औषध वितरण कार्यक्रम 25 एप्रिल रोजी पार पडला. या कार्यक्रमाला खा. भावना गवळी, उपकेंद्र संयोजक शिखरचंद बागरेचा, सहसंयोजक बीजेएसचे जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी, पथक प्रमुख डॉ. सुजाता भगत, नितीन व्यवहारे, संजय भांदुर्गे उपस्थित होते. आतापर्यंत सदर उपक्रमातर्ंगत तीन हजार लोकांना लाभ मिळाला आहे.