नागपुरात आणखी 17 जण पॉझिटिव्ह, एकूण संख्या 119 वर

    दिनांक :26-Apr-2020
|

positve _1  H x 
 
 
नागपूर,
देशात लॉकडाऊन संपायला अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. अशातच सरकारने ज्या शहरात कोरोना हॉटस्पॉट नाहीत अशा ठिकाणी काही प्रमाणात सूट देणे सुरु केले आहे. मात्र, अजूनही देशभरासह राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच नागपूर शहरात आणखी 17 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची स्पष्ट झाल्याने नागपूरकरांची चिंता वाढली आहे.
 
 
 
या सतरा जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असल्याने आता नागपुरमधील कोरोनाबाधितांची संख्या 119 वर पोहचली असल्याची माहिती महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आहे. गुरुवारी एकही कोरोनाग्रस्त न मिळाल्याने आरोग्य यंत्रणेला काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. मात्र शुक्रवारी सात नवीन रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली होती.
 
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचे नवीन ८११ रुग्ण आढळले आहेत. तर, गेल्या चोवीस तासात २२ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या आता ७ हजार ६२८ इतकी झाली आहे. आत्तापर्यंत राज्यात कोरोनाची लागण होऊन ३२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत एक लाख कोरोनाच्या टेस्ट घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.