आंब्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

    दिनांक :26-Apr-2020
|
- पिकल्या आंब्यात अळ्या निघाल्याचा प्रकार उघड

amba_1  H x W:  
 
 
 
कारंजा लाड, 
पिकल्या आंब्यात अळ्या निघालाचा प्रकार कारंजा शहरातील बंजारा कॉलनीत उघड झाल्याने आंब्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात असल्याचे स्पष्ट होत आहे. सदर प्रकरणी प्रकाश सखाराम राठोड यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन आंब्याची विक्री थांबवावी आणि निकृष्ट दर्जाच्या आंब्याची विक्री करणार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. निवेदनानुसार प्रकाश राठोड यांनी 25 एप्रिल रोजी कारंजा येथील सिंधी कँप परिसरातील हातगाडीवरून पिकलेले आंबे विकत घेतले. घरी जाऊन त्याचा रस केला असता त्यामध्ये जीवंत अळ्या आढळून आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. सदर प्रकारावरून जागृत होऊन इतर नागरिकांनीही पिकले आंबे खाण्याचा मोह टाळलेलाच बरा.
 
 
उन्हाळ्याची चाहूल लागताच आठवण होते ती आंब्याची. पुर्वी गावागावात मोठ्या प्रमाणात आंब्याच्या अमराया होत्या. परंतु काळाच्या ओघात गावरानी आंब्याच्या झाडांची कत्तल केल्या गेली. त्यामुळे आज गावरानी आंबा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. गावरानी आंब्यांच्या झाडांची संख्या कमी झाल्याने व असलेल्या झाडांनाही वातावरणातील बदलामुळे मोहर येत नसल्याने गावरानी आंब्याची जागा संकरीत आंब्याने घेतली. त्यामध्ये हापुस, केसर, कलमी, बदाम अशा अनेक प्रजातींचा समावेश आहे. साडेतीन मुहूर्तापैकी एक समजल्या जाणारी अक्षयतृतीया तोंडावर असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक आंब्याची खरेदी करतात.