पायी आपल्या गावी जात असलेल्या मजुरांना दिले जेवण

    दिनांक :26-Apr-2020
|

chikhali_1  H x
 
चिखली,
चिखली शहरालगत असलेली बोरगाव वसु नजीक हायवे वरून 14-15 मजुर, महिला व मुलांसह खामगाव कडे जातांना दिसले संजय टाके यांना दिसले. त्यांनी त्यांना थांबवून विचारपुस केली असता, ते राजंणगाव, पुणे येथुन अकोट येथे त्यांचे गावी पायी निघालेले होते. अतिशय थकलेल्या अवस्थेत सर्वजण असल्याने लगेच टाके यांनी त्यांचे मित्र संतोष गावडे व अमडापुर येथील आघाव यांना परिस्थितीची माहिती दिली व त्यांची जेवणाची व्यवस्था केली. तसेच पुढील प्रवासासाठी बिस्कीटांचे पाकीटे, पिण्याचे पाण्याची बाटली देऊन रवाना केले. असे काही प्रवासी पुन्हा आढळल्यास आम्हाला फोन लावा, आम्ही व्यवस्था करू असे सांगितले, यावेळी टाके यांनी सांगितले.