जातीवाचक शिवीगाळ; उपसरपंचाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

    दिनांक :26-Apr-2020
|

crime_1  H x W: 
 
 
अर्जुनी-मोर,
जातिवाचक शिवीगाळ करून मारपीट केल्याप्रकरणी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील झरपडा येथील अशोक पैका बोरकर यांच्यावर अर्जुनी-मोर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
 
 
दिनांक ८ एप्रिल रोजी कोरोना विषाणू संबंधाने औषध फवारणी दरम्यान चार-पाच व्यक्तींपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊ नये. तसेच गावात शांतता राहावी बांधकाम, ट्रॅक्टरद्वारे काम करू नये अशी मुनादी देण्यात आली होती. मात्र, आरोपी अशोक बोरकर यांनी 9 एप्रिल रोजी विटा विक्री करून गावातीलच किसन दहीवले यांच्या घरी नेऊन टाकल्या. ही बाब लक्षात आल्यावर ग्रामपंचायत सदस्य नरेश राऊत यांनी समजावून सांगितले, तरी सुद्धा चार-पाच हमालांना सोबत घेऊन ग्रामपंचायत सदस्य नारद शहरे यांच्या शेताकडे गेले.  उपसरपंच विश्वनाथ खोब्रागडे हे जमावबंदी व संचारबंदी संबंधात गावात हजर असताना आरोपीने ग्रामपंचायत सदस्य शहारे यांच्या भ्रमणध्वनीवरून कॉल करून बोलाविले. उपसरपंच विश्वनाथ खोब्रागडे तेथे गेले असता आरोपीने ट्रॅक्टर वरून उतरत शिवीगाळ व मारपीट केली. अशी  तक्रार उपसरपंच विश्वनाथ खोब्रागडे यांनी अर्जुनी-मोर पोलिस ठाण्यात दिली होती.
 
 
या प्रकरणाचा तपास देवरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले करीत असून आरोपींविरुद्ध अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार तसेच मारपीट केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.