येणारा महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा करूया

    दिनांक :26-Apr-2020
|
- जिल्हा मुख्यालयीच होणार ध्वजारोहण
 

maharashtra day_1 &n 
 
 
वाशीम,
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी यावर्षी 1 मे रोजी महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात येणार आहे. तसेच केवळ जिल्हा मुख्यालायीच, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
 
 
महाराष्ट्र राज्य स्थापनेला 1 मे रोजी 60 वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, सध्या कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले असून, या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे यावर्षीचा महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. तसेच महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हा मुख्यालयीच ध्वजारोहण करण्याबाबत कळविण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात 1 मे रोजी सकाळी 8 वाजता ध्वजारोहण होणार असून, इतर कार्यालये व अन्य कोणत्याही ठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करू नये. तसेच जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमास इतर अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी उपस्थित राहू नये, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.