हवाई प्रवाशांना होम क्वारंटाईनची परवानगी नाही

    दिनांक :22-May-2020
|
-विदेशी व घरगुती उ-ाणांसाठी स्वतंत्र धोरण
-हॉटेल क्वारंटाईनचा पर्याय उपलब्ध
-किमान 14 दिवसांची अट
नागपूर,
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनाने रेल्वे व हवाई सेवा बंद केल्या होत्या. आता दीड महिन्यानंतर या सेवा पुन्हा बहाल करण्याच्या निर्णयाप्रत सरकार आली आहे. लॉकडाऊनमुळे अनेक जण विविध शहरात अडकून पडले आहेत. आता त्यांना आपल्या शहरात परतता येईल पण 14 दिवसांचे क्वारंटाईन पार करुनच घरी जाता येईल असा धोरणात्मक निर्णय झाला आहे.
 
 
hq_1  H x W: 0
 
विदेशातील रहिवासी भारतीय किंवा अडकून पडलेले नागरिक यांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र शासनाने वंदे भारत योजना सुरू करुन भारतीय दुतावासाकडे अर्ज केल्यास त्यांना मायदेशी आणण्याची सोय करुन दिली आहे पण ही सर्व विमाने भारतातील ज्या शहरात येतील. त्याचठिकाणी या प्रवाशांना 14 दिवस क्वारंटाईन रहावे लागते व त्यानंतर प्रमाणपत्र घेऊन आपल्या शहराकडे घरगुती विमानसेवेने अथवा कारने आपल्या शहरात पोहोचले तरीही या प्रवाशांना थेट घरी जाताच येणार नाही. इंटरनॅशनल फ्लाईटने आले असल्याच 14 दिवस इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन व्हावे लागते. यात या प्रवाशांना थोडा दिलासा म्हणजे हॉटेल क्वारंटाईनची सोय उपलब्ध करुन देण्यात येते पण त्यासाठी लागणारे शुल्क प्रवाशाला भरावे लागते अन्यथा शासनाने व्यवस्था केलेल्या ठिकाणी 14 दिवस रहावे लागते. या 14 दिवसानंतर पुन्हा चाचणी करुन नंतरचे हे प्रवासी घरी जाऊ शकतात.
 
 
 
यातील दुसरा भाग म्हणजे आता देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्याचा शासनाचा विचार आहे. त्यात मात्र काही अटींवर आणि आरोग्य प्रशासनाची खात्री झाल्यास हातावर शिक्का मारुन होम क्वारंटाईनची सोय आहे पण आजवर असे एकही उदाहरण आढळले नसल्याचे या क्षेत्रातील जाणकार सांगतात. येत्या काळात सुरू होणार्‍या विमानसेवेत ज्येष्ठांना आणि दहा वर्षाखालील मुलांना प्रवासाची संधीच नाही अति आवश्यक असल्यास प्रवास करता येईल पण शासकीय विलगीकरणातच रहावे लागेल हे मात्र निश्चित.
 
 
स्थिती, परिस्थितीवर निर्णय
विमानसेवा सुरू करण्याच्या निर्णयानंतर केंद्र शासनाने हवाई प्रवाशांबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. त्यात प्रवासाची परवानगी असली तरी येणारा प्रवासी कोणत्या झोनमधून कुठे जात आहे आणि त्या झोनची स्थिती काय त्या शहराची परिस्थिती काय त्यानुसार यावर निर्णय घेण्यात येतो अशी माहिती मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अविनाश गावंडे यांनी दिली.