बोनीकपूरच्या घरात आणखी कॉरोनाग्रस्त

    दिनांक :22-May-2020
|

काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया पोस्टद्वारे बोनी कपूर यांनी त्यांच्या घरात काम करणाऱ्या एका व्यक्तीची करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याची माहिती दिली होती. आता त्यापाठोपाठ त्यांच्या घरातील आणखी दोन व्यक्तींची करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे समोर आले आहे.

 
 
bonikapoor_1  H
 

‘बॉम्बे टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार काही दिवसांपूर्वी बोनी कपूर यांच्या घरात काम करणाऱ्या एका व्यक्तीची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती. त्यानंतर घरातील इतर सदस्यांची करोना चाचणी करण्यात आली. आता या चाचणीचे रिपोर्ट्स समोर आले असून घरात काम करणाऱ्या आणखी दोन व्यक्तींना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सध्या बोनी कपूर हे त्यांची आणि दोन्ही मुलींची काळजी घेत आहेत. तसेच घरातील सर्व सदस्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

 
 

यापूर्वी बोनी कपूर यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे, ‘आमच्या घरात काम करणाऱ्या एका व्यक्तीची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. तो शनिवारी संध्याकाळपासून आजारी होता. त्यामुळे आम्ही त्याला करोना चाचणी करण्यासाठी पाठवले आणि त्याला आयसोलेशनमध्ये ठेवले. त्याची करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे कळताच आम्ही त्याची माहिती सोसायटीमध्ये दिली’ अशी माहिती दिली होती.