भारत सीमेवर नेपाळकडून सशस्त्र पोलिस चौक्या

    दिनांक :22-May-2020
|
- लिपुलेख वाद चिघळण्याची शक्यता
काठमांडू/पिथौरागड, 
लिपुलेख सीमा प्रश्नावरून भारत आणि नेपाळमधील संबंध बिघडण्याची चिन्हे आहेत. भारताच्या भूभागावर दावा केल्यानंतर आता नेपाळकडून भारताच्या सीमेवर सशस्त्र पोलिस दलाच्या तीन चौक्या सुरू करण्यात येणार आहेत. नेपाळकडून भारताविरोधात आगळीक सुरू असून, त्याला चीनची फूस असल्याची चर्चा सुरू आहे.
 

nepal india boder_1  
 
मागील आठवड्यात चांगरू येथे नेपाळने 25 पोलिसांना पाठवून चौकी तयार केली. नेपाळने आणखी तीन चौक्या बनवणार आहे. झुलाघाट, लाली आणि पंचेश्वर या सीमावर्ती भागातही नेपाळ सशस्त्र पोलिसांच्या चौक्या उभारणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आगामी तीन आठवड्यांत या चौक्या तयार होणार आहेत. या तिन्ही भागात भारत आणि नेपाळमध्ये येण्या-जाण्यासाठी पूलाचा वापर केला जातो.
 
 
 
भारत-नेपाळ सीमेवर भारताकडून सशस्त्र सीमा सुरक्षा दलाचे जवान तैनात असतात. तर, नेपाळमध्ये सीमेवर पोलिसांचा बंदोबस्त असतो. झुलाघाट ही प्रमुख चौकी आहे. लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी या ठिकाणांहून शेकडो नागरिकांची ये-जा सुरू होती. या ठिकाणी एक इमारत भाडेतत्त्वावर घेण्यात आली असून, चौकी तयार करण्याचे काम लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.