लॉकडाऊनमुळे अभिनेत्री झाली बेरोजगार

    दिनांक :22-May-2020
|

वाढत्या लॉकडाउनमुळे सध्या देशभरातील लोक त्रस्त आहेत. लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रोजगार गेल्यामुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. या लॉकडाउनमध्ये आता कलाकारही होरपळू लागले आहेत. दरम्यान अभिनेत्री चाहत पांडे हिने घराचं थकलेलं भाडं देण्यासाठी तरी पैसे द्या अशी विनंती निर्मात्यांना केली आहे.


chahat pandey_1 &nbs


‘हमारी बहू सिल्क’ या टीव्ही मालिकेमुळे नावारुपास आलेली चाहत पांडे सध्या आर्थिक समस्येमुळे त्रस्त आहे. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्या समस्या सांगितल्या. ती म्हणाली, “मी एका प्रसिद्ध टीव्ही मालिकेमधील मुख्य अभिनेत्री आहे. परंतु माझ्या बचत खात्यात आता एक रुपया सुद्धा उरला नाही. माझे सर्व पैसे रोजचा प्रवास आणि खाण्यापिण्यामुळे संपले आहेत. निर्मात्यांनी मला माझ्या कामाचे पैसे अद्याप दिलेले नाहीत. गेल्या अनेक महिन्यांपासून माझं घर भाडं थकलं आहे. घर मालकाने मला घराबाहेर काढण्याची धमकी दिली आहे. अशा करोनाग्रस्त वातावरणात जर त्यांनी मला घराबाहेर काढलं तर मी कुठे जाणार मला माहित नाही. मला आर्थिक मदतीची गरज आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत निर्माते मात्र उत्तर देण्यास टाळाटाळ करत आहेत.” असं चाहत म्हणाली.


 
 

चाहत एक टीव्ही अभिनेत्री आहे. तिने ऐसी दीवानगी देखी नहीं कहीं या मालिकेमधून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. सध्या ती ‘हमारी बहू सिल्क’ या मालिकेमध्ये काम करत आहे. या मालिकेत ती मुख्य व्यक्तिरेखा साकारत आहे. या मालिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. परंतु निर्मात्यांनी पैसे न दिल्यामुळे तिच्यावर आर्थिक समस्येचा डोंगर कोसळला आहे.