व्याजदर कपातीनंतरही शेअर बाजारात घसरण

    दिनांक :22-May-2020
|
मुंबई,
भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्जांवरील व्याजदरात कपात करून, कर्जदारांना कर्जाच्या हप्त्यापासून मोठा दिलासा दिला असतानाही, नफा कमावण्यावर भर असलेल्या गुंतवणूकदारांचे समाधान न झाल्याने, मुंबई शेअर बाजारात आज शुक्रवारी 260 अंकांची घसरण नमूद झाली.
 

shar market_1   
 
 
सकाळीच्या पहिल्याच तासात 500 अंकांची घसरण झाली. त्यानंतर मात्र काही कंपन्यांच्या शेअर्सला चांगला भाव मिळाल्याने खरेदीचे सत्रही सुरू झाले. त्यामुळे घसरण काही प्रमाणात कमी झाली. दिवसभराच्या उलाढालीनंतर शेअर बाजाराचा निर्देशांक 260.31 अंकांच्या घसरणीसह 30,672.59 या स्तरावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्येही 67 अंकांची घसरण झाली. दिवसभराच्या व्यवहारानंतर निफ्टी 9,039.25 या स्तरावर बंद झाला.
 
 
 
 
आजच्या व्यवहारात अॅक्सिस बँकेला सर्वाधिक फटका बसला. त्याखालोखाल एचडीएफसी, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक, टाटा स्टिल, बजाज ऑटो, एचडीएफसी बँक आणि इंडसइंड बँकेला नुकसान सहन करावे लागले. तिथेच मिंहद्रा अॅण्ड मिंहद्रा, इन्फोसिस, एशियन पेंट्‌स, अल्ट्राटेक सिमेंट यासारख्या कंपन्यांचा फायदा झाला.
 
 
 
...म्हणून नफा कमावण्यावर भर
कर्जदारांच्या मासिक हप्ता वसुलीला आणखी तीन महिने मुदतवाढ दिली असतानाही आर्थिक विकासाची िंचता लागून राहिलेल्या गुंतवणूकदारांनी याकडे दुर्लक्ष केले आणि विक्रीचा सपाटा सुरू ठेवला. विश्लेषकांच्या मते, कर्ज वसुलीला स्थगिती वाढविणे ही पुरेशी उपाययोजना नाही. यामुळे बँकिंग क्षेत्र अडचणीत येईल आणि त्याचे प्रतिकूल परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसून येतील. कोरोना संकटाच्या काळात रिझर्व्ह बँकेकडून आम्हाला मोठ्या अपेक्षा होत्या, पण त्या पूर्ण झाल्या नाहीत.