गुलाबो-सीताबोचा ट्रेलर प्रदर्शित

    दिनांक :22-May-2020
|
मुबंई, 
कोरोना व्हायरसचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी देशामध्ये लॉकडाऊन सुरू आहे. अशा परिस्थितीत सिनेमागृहं देखील बंद असल्यामुळे अनेक मोठमोठे चित्रपट ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर प्रदर्शत होणार आहे. बहुचर्चित 'गुलाबो सिताबो' हा महानायक अमिताभ बच्चन आणि आयुष्यमान खुराना स्टारर सिनेमा देखील Amazon प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. शुजित सरकार यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट 12 जूनला 200 हून अधिक देशांमध्ये अमेझॉन प्राइमवर पाहता येणार आहे. थिएटर मालकांमध्ये काहीशी नाराजी असली तरीही लॉकडाऊनमध्ये घरी असलेल्या चित्रपट प्रेमींसाठी मात्र ही खूशखबर आहे.

gul_1  H x W: 0
 
यामध्ये आयुष्मान आणि अमिताभ भाडेकरू आणि मालकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. दोघांमध्ये चालणार तु तु मैं मैं ट्रेलरमध्येच पाहायला मिळत आहे. अमिताभ-आयुष्यान एकमेकांना बोलण्याची एकही संधी सोडत नाही आहेत.
या ट्रेलरच्या सुरूवातीला लखनऊमधील एका जुन्या हवेलीचा मालक असणारा मिर्झा (अमिताभ बच्चन) त्याचा भाडेकरू बंकी (आयुष्मान खुराना)च्या खोलीतून बल्ब चोरी करताना दाखवलं आहे. बंकी मिर्झाच्या हवेलीमध्ये गेली अनेक वर्ष भाडं न वाढवता तिथे राहत असतो. त्यामुळे मिर्झाला एकतर तो तिथे राहायला नको असतो किंवा त्याने जागा सोडावी असं त्याला वाटत असतं. याकरता मिर्झा म्हणजेच अमिताभ बच्चन काय खटाटोप करतो आणि आयुष्मान कसं त्याचच खरं करत असतो असं या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे.