मुंबईत उद्यापासून मद्याची होम डिलिव्हरी

    दिनांक :22-May-2020
|
मुंबई,
मुंबईत मद्याची होम डिलिव्हरी सुरु करण्यास संमती देण्यात आली आहे. मुंबई महापालिका आयुक्तांनी यासंदर्भातले आदेश दिले आहेत. उद्यापासून म्हणजेच शनिवारपासून घरपोच मद्य पोहचवण्यास विक्रेत्यांना संमती देण्यात आली आहे.

liquer mumbai_1 &nbs
कंटेन्मेट झोन अर्थात करोना प्रतिबंधित क्षेत्रात मात्र मद्य मिळणार नाही असंही आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे. तसंच सोशल डिस्टन्सिंगचं पालन होत नसल्याने वाईन शॉप्स बंदच राहतील असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. ही विक्री करताना राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाने घालून दिलेले निर्देश पाळणे बंधनकारक असणार आहे असंही मुंबईचे आयुक्त इकबालसिंग चहल यांनी म्हटलं आहे