मध्यप्रदेशात अनेक जिल्ह्यांत टोळधाड

    दिनांक :22-May-2020
|
-15 जिल्ह्यांत नवे संकट
भोपाळ, 
मध्यप्रदेशच्या पश्चिमेकडील 15 जिल्ह्यांमधील अनेक गावांवर बुधवारी सायंकाळी टोळधाडीचे नवे संकट निर्माण झाले. पानबिहार जिल्ह्यातील राणा हेडा गावातील झाडांवर हजारोच्या संख्येने टोळ दिसून आल्याने त्यांना नियंत्रित करण्यासाठी औषधांची फवारणी केल्याची माहिती आहे.
 
 
 
toldhad_1  H x
 
पानबिहारमधील अनेक गावांमध्ये 20 मे रोजी सायंकाळी हजारोंच्या संख्येने टोळ दिसून आले. भाऊसाखेडा, निनोरा, खोखरा, अमरपुरा, हनुमंतिया, गुर्जर खेडी, खोर, नयागाव, केशरपुरा, कनका, सगराना, बरखेडा गुर्जर, अर्निया बोराणा, सकराणी जागीर, धौकखेडा, कुचाडौड, सोनी, खोख्रा, निनोरा, चांदवासा, मुल्तानपुरा, गुरडिया देडा येथील शेतांमध्ये धाड शिरली. यावेळी शेतकर्‍यांनी ढोल, डीजे वाजवून टोळांना पळवून लावण्याचा प्रयत्न केला. काहींनी मशाली पेटवून शेतामध्ये धाव घेतली. तरीही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले.
 
 
 
या नव्या संकटामुळे हजारो शेतकर्‍यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, रणहेरा गावात टोळांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारी यंत्रणांनी 12 किलोमीटरच्या परिसरात औषधांची फवारणी केल्याची माहिती कृषी विभागाच्या उपसंचालिका नीलम िंसह यांनी दिली. राजस्थानला लागून असलेल्या मध्यप्रदेशच्या सीमा भागामध्ये टोळांचे नऊ मोठे गट सक्रिय झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.