देसाईगंज येथे भाजपाकडून महाराष्ट्र बचाव आंदोलन

    दिनांक :22-May-2020
|
- काळे मास्क लावून केला राज्य सरकारचा निषेध
देसाईगंज,
कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यात अपयश आल्याचा निषेध करत भारतीय जनता पार्टी शाखा देसाईगंज तालुक्याच्या भाजप जिल्हा अध्यक्ष किसनजी नागदेवे व आ.कृष्णा गजबे यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक २२ मे रोजी सकाळी ११ वाजता फवारा चौक वडसा येथे मूक मोर्चा काढण्यात आला. देश व राज्य कोरोना विषाणूमुळे हाहाकार झालेला असून अजून सुद्धा राज्य सरकारने राज्याच्या नागरिकांना वाचवण्यासाठी असमर्थ दाखवली असून आम जनतेला मोठे त्रास सोसावे लागत आहे,परंतु जनतेच्या हितासाठी राज्य सरकारने वेगळे आर्थिक पॅकेज ची अजून प्रयन्त घोषणा केलेली नाही.
 

andolan_1  H x  
 
भारतीय जनता पार्टी तर्फे राज्याच्या रिक्षाचालक, टॅक्सीचालक,घरकामगार,बाराबलुतेदाराना आर्थिक पॅकेज जाहीर रा,आधारभूत किंमतीवर धान्य खरेदी करा,सरसकट संपूर्ण कर्जमाफी करा,वीज बिल माफ करा,शाळेची फि रद्द करा,शिधापत्रिका नसलेल्याना धान्य वाटप करा,शिधापत्रिकेवर साखर,डाळ,किराणा देण्यास सुरुवात करा,विध्यार्थीना ,जेष्ठांना,महिलांना मोफत प्रवासाची सोय करा,खाजगी रुग्णांना मोफत उपचाराची सोय करा ,निराधार श्रावण बाळ लाभार्थ्यांना तात्काळ पैसे दया.शेतकऱ्यांना मोफत बि-बियाणे उपलब्ध करून दया,तीन महिन्याचे घर भाडे माफ करा अश्या विविध मागण्यांसाठी भाजप राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन केले यावेळी भाजप जेष्ठ नेते मोतीलालजी कुकरेंजा ,न.प नगराध्यक्षा शालुताई दंडवते, भाजप तालुका अध्यक्ष राजू जेठाणी, राजरतनजी मेश्राम,भाजप यु.मो ता अध्यक्ष प्रमोदभैया झिलपे ,संतुमल जी शमदासानी ,लालाजी रामटेके व भाजप चे जेष्ठ प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.