आता ॲमेझॉनही घरपोच खाद्यपदार्थ पोहोवणार

    दिनांक :22-May-2020
|
बंगळुरू, 
आता ॲमेझॉन इंडियाने ऑनलाईन फूड डिलिव्हरी क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला असून, बंगळुरू शहरातील काही भागांमध्ये घरपोच जेवण पोहोचविण्याची सुविधा देणार आहे. कंपनी सूत्रांनी या संदर्भात माहिती दिली. दरम्यान, या निर्णयामुळे पुढील काळात स्विगी आणि झोमॅटोला चांगलीच टक्कर मिळण्याची शक्यता आहे.
 
 
amazon_1  H x W
 
मागील काही वर्षांपासून स्विगी आणि झोमॅटो ग्राहकांना घरपोच जेवण पोहोचविण्याचे काम सातत्याने करत आहेत. अल्प कालावधीतच या कंपन्यांनी अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली होती. परंतु, कोरोना संकटाच्या पृष्ठभूमीवर कर्मचार्‍यांची कपात करण्याचा निर्णय जाहीर केल्याने, नेमकी हीच संधी साधत ॲमेझॉन इंडियाने ऑनलाईन फूड डिलिव्हरी क्षेत्रात पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
 
 
 
सध्या बंगळुरूतील काही ठराविक भागांमध्ये ही सेवा दिली जाणार आहे. ग्राहकांना निवडक स्थानिक हॉटेल आणि क्लाऊड किचनमधून जेवण मागवता येणार आहे. उत्तम पदार्थ मिळावेत. तसेच, त्यांच्या अपेक्षांप्रमाणेच सेवा पुरवावी यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे कंपनीने म्हटले आहे. दरम्यान, मागील काही काळापासून ऑनलाईन फूड डिलिव्हरी क्षेत्रात झोमेटो आणि स्विगीचा दबदबा असताना अॅमेझॉनचे मोठे आव्हान ठरण्याची शक्यता आहे.