पाकिस्तानने गुलाम काश्मीर दाखवला भारतात

    दिनांक :22-May-2020
|
इस्लामाबाद, 
भारताने गुलाम काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तानमधील हवामानाचे वृत्त देण्यास सुरुवात केल्यानंतर पाकिस्तान बिथरला होता. त्यानंतर पाकिस्तानने गुलाम काश्मीर आपलाच हिस्सा असल्याचे सांगत गदारोळ केला. आता एका तांत्रिक चुकीमुळे गुलाम काश्मीर भारताचा भाग असल्याचे दाखविण्यात आले आहे.
 
gulam kashmir_1 &nbs
 
पाकिस्तानने कोरोना संसर्गाबाबतची माहिती देण्यासाठी एक संकेतस्थळ बनवले आहे. यामध्ये पाकिस्तानचाही नकाशा देण्यात आला. या नकाशात शेजारचा देश म्हणून भारतही दाखवण्यात आला. मात्र, या नकाशात गुलाम काश्मीर हा भारताचाच भूभाग असल्याचे दाखवण्यात आले. हा नकाशा समोर आल्यानंतर पाकिस्तानमध्ये गदारोळ झाला.
 
 
पाकिस्तानकडून त्यांच्या नकाशात ही चूक जाणीवपूर्वक झाली नसल्याचे समोर आले आहे. संकेतस्थळावर अपलोड केलेला नकाशा हा मायक्रोसॉफ्टने तयार केलेला आहे. जगातील काही देशांमध्ये सीमा प्रश्नावर वाद असल्यामुळे प्रत्येक देशांनुसार सीमा बदलत असतात. ज्या अधिकृत नकाशा म्हणून संबंधित देशांनी ज्या नकाशाला मान्यता दिली आहे. तोच नकाशा दाखवण्यात येतो. त्यामुळे भारतात दाखवण्यात येणारे गुलाम काश्मीर हे भारताच्या नकाशानुसार आहे. पाकिस्तानने गुलाम काश्मीरवरील आपला दावा अद्यापही सोडलेला नाही.