एसटी निघाली प्रवासाला, पण प्रवासीच नाहीत

    दिनांक :22-May-2020
|
- जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरु, स्थानके रिकामी
भंडारा,
गत दोन महिन्यांपासून ओस पडलेल्या बसस्थानकावर बस दिसली खरी मात्र प्रवाशांची उणीव जाणवत होतीच. आधीच ५० टक्‍केच वाहतुक सुरू केली गेली पण त्यातही प्रवाशीच नसल्याने महामंडळाचा हा प्रयोग असतो की काय असे वाटू लागले आहे. असे असले तरी या प्रवासाच्या तोंडाला मास्क नसेल त्याला गाडीत न घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. कोरोनाच्या सावटात अनेक जण अडचणीत आले. राज्य परिवहन महामंडळाची सेवा त्यापैकी एक.जिल्ह्यसह जिल्ह्याबाहेर लांब पल्ल्याच्या गाड्या सोडून प्रवाशांच्या सेवेत हे महामंडळ होते. मात्र मागील दोन महिन्यात ही सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. बस स्थानकातील गाड्या आगारात जमा झाल्या होत्या. स्थानकाचे प्रवेशद्वार बंद होते.
 
 
stbha_1  H x W:
 
आज पहिल्यांदा ते उघडून बसस्थानकावर एसटी महामंडळाच्या तुरळक गाड्या होत्या. निमित्त होते आजपासून सुरू झालेल्या महामंडळाच्या सेवेचे. नियमित बस फेर्‍यांच्या ५० टक्के वाहतुकीस शासनाने परवानगी दिली आहे. त्या नुसार आजपासून महामंडळाची बस धावू लागले. भंडारा विभागातील सहा आगरातून २७२ म्हणजेच जवळपास १२ हजार किलोमीटर प्रयन्त सेवा देण्याचे नियोजन महामंडळाने केल्याचे समजते. यासाठी ५९ वाहक व चालक यांची सेवा घेतली जाणार आहे. सकाळी ७ ते रात्री ७ पर्यंत सेवा देण्याचे निर्देश आहेत. मात्र आज प्रत्येक आगरातून १ ते २ फेऱ्याच निघाल्याची माहिती आहे. स्थानकात गाड्या आल्या मात्र प्रवास करण्यासाठी प्रवाशी नसल्याने रिकाम्या गाड्या सोडण्याचा प्रसंगही ओढविला. दरम्यान बसमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला मास्क बंधनकारक असून नसेल तर बस मधून प्रवास करू दिला जाणार नसल्याचेही एका अधिकाऱ्याने सांगितले.