राज्यात आज आतापर्यंतचे सर्वाधिक रूग्ण

    दिनांक :22-May-2020
|
- कोरोनाबाधितांची संख्या ४४ हजार ५८२
तभा वृत्तसेवा
मुंबई,
राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या ४४ हजार ५८२ झाली आहे. आज २९४० नविन रूग्णांचे निदान झाले. राज्यात आज ८५७ कोरोनाबाधित रूग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १२ हजार ५८३ रूग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या ३० हजार ४७४ रूग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी सांगितले.
 
coronavirus_1  
 
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३ लाख ३२ हजार ७७७ नमुन्यांपैकी २ लाख ८८ हजार १९५ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरीता निगेटिव्ह आले आहेत तर ४४ हजार ५८२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ४ लाख ६९ हजार २७५ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून २८ हजार ४३० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात ६३ कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूंची नोंद आज झाली असून मृतांची एकूण संख्या १५१७ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईमध्ये २७, पुण्यात ९, जळगावमध्ये ८, सोलापूरात ५, वसई-विरारमध्ये ३, औरंगाबाद शहरात ३, साताऱ्यात २, मालेगावात १, ठाण्यात १, कल्याण-डोंबिवलीत १, उल्हासनगरमध्ये १, पनवेलमध्ये १ तर नागपूर शहरात १ मृत्यू झाले आहेत. आज नोंद झालेल्या मृत्यूंमध्ये ३७ पुरूष तर २६ महिला आहेत. आज झालेल्या ६३ मृत्यूंमध्ये ६० वर्षे किंवा त्यावरील २८ रूग्ण आहेत तर ३१ रूग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. यातील ४६ जणांमध्ये (७३ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
 
राज्यातील रूग्णांचा तपशील (कंसात मृत्यूंची आकडेवारी)
मुंबई महानगरपालिका: २७,२५१ (९०९), ठाणे: ३६६ (४), ठाणे मनपा: २२३४ (३३), नवी मुंबई मनपा: १७७६ (२९), कल्याण-डोंबिवली मनपा: ७२७ (७), उल्हासनगर मनपा: १४४ (३), भिवंडी-निजामपूर मनपा: ८२ (३), मीरा-भाईंदर मनपा: ३८८ (४), पालघर:१०७ (३), वसई-विरार मनपा: ४५१ (१४), रायगड: २९९ (५), पनवेल मनपा: २८२ (१२), नाशिक: ११५, नाशिक मनपा: ९३ (२), मालेगाव मनपा: ७१० (४४), अहमदनगर: ४९ (५), अहमदनगर मनपा: २२ धुळे: १७ (३), धुळे मनपा: ८० (६), जळगाव: २८६ (३६), जळगाव मनपा: १०९ (५), नंदूरबार: ३२ (२), पुणे: २८३ (५), पुणे मनपा: ४४९९ (२३१), पिंपरी-चिंचवड मनपा: २११ (७), सोलापूर: १० (१), सोलापूर मनपा:५२२ (३२), सातारा: २०४ (४), कोल्हापूर:१७५ (१), कोल्हापूर मनपा: २०, सांगली: ६२, सांगली-मिरज-कुपवाड मनपा: ९ (१), सिंधुदूर्ग: १०, रत्नागिरी: १३५ (३), औरंगाबाद: २२, औरंगाबाद मनपा: ११६५ (४२), जालना: ४६, हिंगोली: ११२, परभणी: १७ (१), परभणी मनपा: ५, लातूर: ५८ (२), लातूर मनपा: ३, उस्मानाबाद: २६, बीड: २६, नांदेड: १५, नांदेड मनपा: ८३ (४), अकोला: ३१ (२), अकोला मनपा: ३३६ (१५), अमरावती: ९ (२), अमरावती मनपा: १३६ (१२), यवतमाळ: ११३, बुलढाणा: ३९ (३), वाशिम: ८, नागपूर: ३, नागपूर मनपा: ४५७ (७), वर्धा: ३ (१), भंडारा: ९, गोंदिया: २८, चंद्रपूर: ८, चंद्रपूर मनपा: ७, गडचिरोली: ९, इतर राज्ये: ४८ (११), एकूण: ४४ हजार ५८२ (१५१७).