हॉटेल व्यवसायाचे स्वरूप आता पालटणार

    दिनांक :22-May-2020
|
- बिल देण्यासाठी डिजिटल किंवा ऑनलाईन पेमेंटचा पर्याय राहणार
- दोन ग्राहकांमध्ये विशिष्ट अंतर राखावे लागणार
नवी दिल्ली,
कोविड-19ची साथ संपल्यानंतर जग फार बदललेले असेल. साथ संपली, तरी संसर्गाचा धोका टाळण्यासाठी पुढे बराच काळ मास्क आणि सॅनिटायझरचा वापर चालू ठेवावा लागेल, भौतिक दूरता राखण्याची सवय करून घ्यावी लागेल. सार्वजनिक ठिकाणी वावरताना अनेक बंधने पाळावी लागतील. ग्राहकांची गर्दी असणार्‍या हॉटेल आणि रेस्टॉरंट्समध्ये तर, हे नियम कसोशीने पाळावे लागतील. साथीनंतर हॉटेल व्यवसायाचे स्वरूप पालटून गेलेले असेल.
 

hotel_1  H x W: 
 
कोरोनाच्या साथीने आपले जगणे बदलून टाकले आहे. ग्राहकांना खाद्यसेवा पुरविणार्‍या व्यावसायिकांना तर, जास्तच काळजी घ्यावी लागेल. पूर्वीप्रमाणे हॉटेलमध्ये गर्दी करता येणार नाही. प्रत्येक टेबलमध्ये पुरेसे अंतर राखावे लागेल आणि कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य दिले जाईल, असे दिसते.
 
 
 
हॉटेल आणि रेस्टॉरंट्‌सचा परिसर स्वच्छ असेल, प्रत्येक टेबलवर सॅनिटायझर, दारावर मोस्कॅनर असेल, हॉटेलचे कर्मचारी मास्क आणि ग्लोव्हज घातलेले असतील आणि ग्राहकांनाही ते वापरावे लागतील. एखाद्या रुग्णालयाचे हे वर्णन वाटेल; पण आता भविष्यात हेच चित्र दिसणार आहे. केवळ एवढ्यावर हे थांबणार नाही, तर मेन्यूसाठी क्यूआर कोड असेल आणि बिल देण्यासाठी ऑनलाईन किंवा कवा डिजिटलचा पर्याय असेल. रोखीचे व्यवहार जवळपास बंदच होतील. म्हणजे, कुणाचाच कुणाला स्पर्श होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.
 
 
ग्राहकांची सुरक्षा हाच निकष असेल
ग्राहकांची सुरक्षा या एकमेव निकषावर यापुढे हॉटेल आणि रेस्टॉरंट्सचा व्यवसाय चालणार असल्याचे मेनलँड चायना आणि एशिया किचनचे प्रमुख अंजन चटर्जी सांगतात. साथीपूर्वी भारतात हॉटेल आणि रेस्टॉरंट्स पूर्ण भरलेली असायची. ती पुन्हा सुरू झाल्यावर हे प्रमाण 25 ते 30 टक्क्यांवर येईल, असा त्यांचा अंदाज आहे.