चीननंतर 'या' देशाने लपवली माहिती

    दिनांक :22-May-2020
|
रोम,
चीनच्या वुहान शहरातून कोरोना व्हायरसची सुरुवात झाली होती. दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये या व्हायरसने संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतले. या व्हायरसमुळे जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिका देशाला बसला आहे. दरम्यान, ब्रिटन आणि चीन या देशांनी कोरोना मृतांच्या संख्येबाबत माहिती लपवल्याचा आरोप काही दिवस आधी करण्यात आला होता. मात्र, आता इटलीने देखील कोरोना मृतांचा आकडा लपवल्याचे समोर आले आहे.
 
italy coronavirus_1  
 
 
इटलीमध्ये दिलेल्या मृतांच्या आकड्यापेक्षा ती संख्या अधिक असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनामुळे इटलीत ३२ हजार लोकांचा मृत्यू झाला, अशी माहिती सरकारने दिली. मात्र, या मृत्यूची संख्या नोंदलेल्या संख्यापेक्षा १९ हजारपर्यंत जास्त असू शकते, असे इटलीच्या राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा एजन्सीने म्हटले आहे. 
 
 
आयएनपीएस इटलीमधील सर्वात मोठी सामाजिक सुरक्षा आणि कल्याण एजन्सी आहे. सरकारच्या आकडेवारीवर विसंबून राहणे शक्य नसल्याचे एजन्सीने स्पष्टपणे सांगितले आहे. कारण मृत्यूच्या संख्येत एवढा मोठा फरक करता येणार नाही. एजन्सीने एका अभ्यासानुसार सांगितले आहे की, गेल्या मार्च-एप्रिलमध्ये इटलीमध्ये एकूण १ लाख ५६ हजार ४२९ मृतांचा आकडा आहे. २०१५ ते २०१९ या काळात इटलीमध्ये झालेल्या मृत्यूच्या सरासरीपेक्षा ही संख्या ४६,९०९ जास्त आहे. परंतु, यापैकी केवळ २७,९३८ मृत्यू सिव्हिल प्रोटेक्शन एजन्सीने कोरोना विषाणूशी जोडले आहेत, ज्यामुळे संशय निर्माण होतो. यापैकी १८,९७१ मृत्यू सामान्यपेक्षा अधिक आहेत, याचा शोध घेणे फार महत्वाचे आहे.
 
कोरोनाचा संसर्ग सर्वाधिक झालेल्या भागात या सर्व मृत्यूची नोंद झाली असल्याचे एजन्सीने म्हटले आहे. सरकारचे म्हणणे आहे की या भागात विशेषत: उत्तर इटलीमध्ये हे संक्रमण सर्वात वाईट होते. आयएनपीएस म्हणते की, वाढीव मृत्यूंना केवळ कोरोना विषाणूशी जोडले जाऊ शकत नाही. परंतु, कोरोनाच्या रूग्णांमुळे इतर लोकांना आरोग्यसेवा मिळू शकली नाही. कारण त्यांच्याव्यतिरिक्त इतर रुग्णालयातही स्थान नव्हते. शुक्रवारपर्यंत, कोरोना विषाणूमुळे इटलीमध्ये अधिकृत मृत्यूचा आकडा ३२ हजार ४८६ आहे आणि यापैकी २६ हजार ७१५ लोक उत्तर इटलीच्या लोम्बार्डीमध्ये मरण पावले आहेत. कोरोना विषाणूमुळे हा युरोपमधील सर्वात जास्त प्रभावित क्षेत्र आहे.