मेक्सिकोतील फुटबॉल लीग अडचणीत

    दिनांक :22-May-2020
|
मेक्सिको,
मेक्सिकोतील सांतोस लागुना या अव्वल संघातील आठ फुटबॉलपटूंना कोरोनाची बाधा झाल्याचे क्लबने म्हटले आहे. त्यामुळे दोन महिन्याच्या स्थगितीनंतर आता लिगा एमएक्स ही मेक्सिकोची राष्ट्रीय फुटबॉल लीग पुन्हा सुरू करतानाच्या अडचणीत वाढ झाली आहे.
 
liga mx_1  H x
 
 
लिगा एमएक्स ही फुटबॉल लीग या आठवडय़ाच्या अखेरीस सुरू होणार होती. पण आता सरावाला सुरुवात करण्यासाठीच्या अडचणी वाढल्या आहेत. ४८ खेळाडू व प्रशिक्षकांच्या कोरोनाबाबतच्या चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी २२ जणांचे अहवाल आले आहेत. त्यामुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होऊ शकते, असे सांतोस लागुनाचे मालक अलेजांड्रो इरारागोरी यांनी सांगितले आहे.