नागपूर रेड झोनमध्ये कायम

    दिनांक :22-May-2020
|
- जीवनावश्यक तसेच एकल दुकानांनाच परवानगी
नागपूर,
नागपूर (nagpur) शहराचा समावेश शासनाने रेड झोनमध्ये (red zone) कायम ठेवल्याने लॉकडाऊन ४ (lockdown 4) ची अंमबजावणी अधिक कडक करण्यात आली आहे. प्रशासनाने परवा जाहीर केल्यानुसार, लॉकडाऊनच्या चवथ्या टप्प्यात (lockdown 4) 'रेड झोन' (red zone) आणि 'नॉन रेड झोन' (non red zone) असे दोन भाग असून रेड झोनमध्ये (red zone) काही निवडक जिल्ह्यांसह विदर्भातील अकोला आणि अमरावती महापालिका क्षेत्राचा समावेश करण्यात आला, असल्याची माहिती मनपा आयुक्त तुकाराम मुंढे (tukaram mundhe) यांनी दिली. नागपूर जिल्ह्यासह उर्वरित भाग हा 'नॉन रेड झोन' (non red zone) होता. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते. असे का झाले, याबाबत कुणाच वरिष्ठ अधिकाऱ्यांजवळ उत्तर नव्हते.
 
 
tukaramm_1  H x
 
मात्र, शहरात वाढते कोरोनाचे रुग्ण आणि त्यामुळे वाढता संसर्गाचा धोका लक्षात घेता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने नागपूरला रेड झोनमध्येच ठेवण्याची विनंती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्य शासनाला केली होती. शासनाने काल गुरुवारी उशिरा नागपूर शहर रेड झोनमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट निर्देश दिले असून नागपूर महापालिकेच्या हद्दीमध्ये रेड झोन संबंधीचे आदेश लागू राहतील, अशी माहिती मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.
 
 
 
नवीन आदेशानुसार खाजगी कार्यालये पूर्णत: बंद राहणार आहेत. स्टॅन्डअलोन स्वरूपातील सर्व प्रकारची दुकाने सुरू ठेवता येणार आहे. प्रतिबंधित क्षेत्राव्यतिरिक्त अन्य ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त ज्या बाबींना परवानगी देण्यात आली आहे ती प्रतिष्ठाने फक्त सकाळी ७ ते रात्री ७ या वेळेत सुरु राहतील. प्रवासी वाहतूक, कॅब आणि टॅक्सी सेवा, थिएटर, मॉल, मार्केट, जलतरण हौद, जिम आदींना परवानगी राहणार नाही.
 
 
 
चारचाकी वाहनात अत्यावश्यक कामासाठीच एक अधिकदोन तसेच दुचाकीवर अत्यावश्यक कामासाठीच एकालाच परवानगी आहे. मास्क बंधनकारक, लग्न वा अंत्यविधीत ५० व्यक्तीच, दुकानात दोघात ६ फुट अंतर, एकावेळी ५ व्यक्ती, मास्क, भौतिक दूरता व स्वच्छतेचे पालन होत नसल्यास दुकानदारांवर सक्त कारवाईचे अधिकार प्राधिकृत अधिकाèयांना आहेत.
कंटेन्मेट झोन
निवासी कॉलनी, मोहल्ला, झोपडपट्टी, इमारत, इमारतींचा समूह, गल्ली, वॉर्ड, पोलिस ठाण्याचे क्षेत्र, गाव किंवा गावांचा छोटा समूह असे कंटेनमेंट झोनचे क्षेत्र असू शकेल. कंटेनमेंट क्षेत्रात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शिकेतील सूचनांचे कटाक्षाने पालन केले जाईल. ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, गरोदर आणि १० वर्षांखालील मुले यांना घरातच थांबणे आवश्यक आहे.
बंदच
मेटड्ढो सेवा, शिक्षण संस्था, हॉटेल्स, रेस्टॉरंट, शिकवण्या, चित्रपटगृहे, शॉपिंग मॉल्स, व्यायामशाळा, क्रीडा संकुल, जलतरण तलाव, नाट्यगृहे, सलून, स्पा, बार, जाहीर कार्यक्रम, धार्मिक स्थळे, बंदच राहतील.
रात्रीची संचारबंदी
अत्यावश्यक सेवा वगळता रात्री ७ ते सकाळी ७ वाजता या दरम्यान संचारबंदी असेल. दिवसा कलम १४४ जमावबंदीची कडक अंमलबजावणी प्रशासन करेल.
कुठे सुरू तर कुठे बंद
लॉकडाऊनचा चवथा टप्पा सुरू झाला असला तरी दुकानदारांमध्ये संभ्रम असल्याने प्रत्यक्षात कुठे बाजारपेठ सर्रास सुरू तसेच कुठे कडकडीत बंद अशी स्थिती नागपुरात दिसते आहे. काही दुकाने जीवनावश्यक दुकाने उघडण्याची परवानगी असली तरी दुकानदारच एकतर कोरोनाच्या भीतीने qकवा मग इतर काही अडचणींमुळे उघडत नाहीत. नक्की कुठली दुकाने उघडायची, याबाबत प्रशासनाने पुन्हा एकदा स्पष्ट करण्याची गरज आहे.