आदित्य ठाकरेंच्या ट्विटला नितेश राणेंची चपराक!

    दिनांक :22-May-2020
|
मुंबई,
कोरोना प्रसाराला रोखण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. महाराष्ट्रात हाताबाहेर गेलेल्या स्थितीचा निषेध करण्यासाठी भाजपाने महाराष्ट्र बचाओ आंदोलन केले. भाजपाच्या या आंदोलनावर आदित्य ठाकरेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन टीका केली. सत्तेच्या राजकारणासाठी चाललेले हे आंदोलन अत्यंत लाजीरवाणे आहे. कोरोनाला विसरुन राजकारण प्रिय असल्याचे भाजपाने दाखवून दिले, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी एक फोटो शेअर केला आहे. लहान मुलांना उन्हात उभे करुन त्यांच्या सुरक्षितेची काळजी घेतली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. कोरोनाच्या पृष्ठभूमीवर या लहान मुलांना घरात आणि सुरक्षित ठेवणे गरजेचे असताना, हे काय चाललंय? कोरोना को भुल गये, पॉलिटीक्स प्यारा है... असे आदित्य ठाकरेंनी ट्विट केले. आदित्य ठाकरेंच्या आदित्य ठाकरेंच्या ट्विटला नितेश राणेंनी थेट उत्तर दिले आहे.nitesh rane_1  
शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी खालील पातळीचा विश्वविक्रम याबद्दल बोलूच नये, कारण त्यांच्या मुख्यमंत्र्यांमुळे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढती संख्या ही न्यूयॉर्कच्या बरोबरीने आहे. जर थोडी लाज असेल तर काहीतरी काम करा आणि आम्हाला या महामारीच्या संकटापासून वाचवा, असे राणे म्हणाले. तसेच, आदित्य ठाकरेंनी ट्विट केलेल्या दुसऱ्या फोटोवरुनही नितेश राणेंनी आदित्य यांनाच लक्ष्य केले. जर, सत्तेची लालसा मुलाला पर्यावरणमंत्री आणि मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न कुठलेही कष्ट न घेता पूर्ण करु शकते. तर, सर्वकाही शक्य आहे मित्रा. असे नितेश म्हणाले.