आंतरराष्ट्रीय नेमबाज खेळाडूची सरावाला सुरुवात

    दिनांक :22-May-2020
|
कोल्हापूर,
कोरोनाच्या संकटकाळात देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा कधी सुरू होतील हे अद्याप सांगता येत नाही. मात्र, राज्य सरकारने खेळाडूंना वैयक्तीक सराव करण्याची परवानगी दिल्यानंतर अनेक खेळाडूंनी सरावाला सुरुवात केली आहे. 
 

riha_1  H x W:  
 
नेमबाजीत आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा तिरंगा फडकावणाऱ्या कोल्हापूरच्या राही सरनोबतने शुक्रवारपासून सरावाला सुरूवात केली. राहीने कोल्हापूरमधील रेसकोर्स येथील छत्रपती संभाजीराजे क्रीडा संकुलात २५ मीटर नेमबाजी सरावाला सुरूवात केली. यावेळी राहीने कोरोना व्हायरसपासून बचावासाठीची आवश्यक अशी सर्व काळजी घेतली होती. सराव करताना राहीने मास्क घातला होता.
 
राहीने वर्ल्ड कप स्पर्धेत दोन सुवर्ण आणि एक कास्य, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्ण आणि एक रौप्य आणि आशियाशी स्पर्धेत एक सुवर्ण आणि एक कास्य पदक जिंकली आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला नेमबाज आहे.