रवी शास्त्री यांच्याकडून अमोल मुझुमदारचे कौतुक

    दिनांक :22-May-2020
|
 ravi shastri_1
 
मुंबई,
भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर मुंबईकर खेळाडू अमोल मुझुमदार याच्यासोबतचा फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अमोलचे कौतुक केले आहे. अमोल मुझुमदारला भारतीय कसोटी संघात स्थान न मिळणे हा भारतीय संघाचा सर्वात मोठा तोटा आहे, असे रवी शास्त्री यांनी म्हटले आहे.
 
रणजी क्रिकेटमध्ये अमोल मुझुमदारचे नाव हे गाजले होते. आपल्या काळात अमोलने मुंबई, आसाम आणि आंध्र प्रदेश या ३ संघांचे प्रतिनिधीत्व केले. खडूस मुंबईकर म्हणून प्रसिद्ध असलेल्या अमोलला भारतीय संघात स्थान मिळवता आले नाही. अमोल मुझुमदारनेही रवी शास्त्री यांनी शेअर केलेल्या फोटोवर आपली प्रतिक्रीया देत त्यांचे आभार मानले आहे.