टी-२० लिग खेळण्याची परवानगी द्या : रॉबिन उथप्पा

    दिनांक :22-May-2020
|
नवी दिल्ली,
काही दिवसांपूर्वी इरफान पठाण आणि सुरेश रैना यांनी बीसीसीआयने भारतीय खेळाडूंना परदेशी टी-२० लिगमध्ये खेळण्याची परवानगी द्यावी हा मुद्दा चर्चेला आणला होता. यानंतर अनेक मतमतांतर पुढे आली. या खेळाडूंच्या यादीत आता रॉबिन उथप्पाचे नावही दाखल झाले आहे. कृपा करून आम्हाला परदेशी टी-२० लिगमध्ये खेळण्याची परवानगी बीसीसीआयने द्यावी, असे रॉबिन उथप्पाने म्हटले आहे.

robin uthappa_1 &nbs 
 
 
ज्यावेळी संधी असूनही तुम्हाला बाहेर जाता येत नाही, त्यावेळी दुःख होते. प्रत्येक देशातील खेळाडूंसोबत विविध वातावरणात खेळतानाचा अनुभव हा क्रिकेटपटू म्हणून तुम्हाला उपयोगात येतो. सध्या सौरव गांगुली यांच्याकडे बीसीसीआयचे नेतृत्व आहे. ते खूप पुढारलेल्या विचारांचे आहे. गांगुली यांच्यामुळे भारतीय क्रिकेट हे वेगळ्या स्तरावर पोहचले आहे. मला आशा आहे की ते कधीतरी या मुद्द्याकडे लक्ष देईल, असे रॉबिनने एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले.