स्पर्श करुन भीक मागण्याचा नवा फंडा

    दिनांक :01-Jun-2020
|
-भिकार्‍यांच्या नियंत्रणाची गरज
-बाधितांमध्ये भर टाकण्याची भिती
-स्पर्श करुन मागणे गैर
 
नागपूर,
कोरोना बाधितांची संख्या नागपुरात सातत्याने वाढत आहे. लॉकडाऊन सुरू असेपर्यंत रस्त्यावर भिकारी दिसत नव्हते पण आता सर्व व्यवहार सुरू झाले आणि भिकारी देखील पुन्हा रस्त्यावर येऊन भीक मागत आहेत. यातही अंगाला स्पर्श करुन भीक मागण्याचा नवाच फंडा सुरू झाल्याने दुचाकी आणि कारचालक देखील भयभीत होत असल्याची स्थिती आहे.bhikari nagpur_1 &nb
मागील वर्षभरापासून रस्त्यावरील भिकारी व त्यांची मुले यांना पकडून भिक्षेकरी स्वीकार केंद्रात त्यांची रवानगी करण्यात येत होती. असा हा उपक्रम स्मार्ट सिटी अंतर्गत राबविण्यात येत होता आणि त्यामुळे रस्त्यावरील नागरिकांना काहीसा दिलासा देखील मिळाला होता पण कोरोना लॉकडाऊन सुरू होताच मनपाची संपूर्ण यंत्रणा या कामात लागली आणि या लोकांकडे दुर्लक्ष झाले. आता लॉकडाऊन संपल्यात जमा आहे आणि सर्व लोक देखील बाहेर पडले आहेत. आता रस्त्यावर रहदारी देखील सुरू झाली आहे. त्यामुळे दुचाकी व चारचाकीहून जाणारे नागरिक ट्रॅफिक लाईटनुसार चौकात थांबले तर हे भिकारी व त्यांची मुले दुचाकीवरील नागरिकांना स्पर्श करतात आणि भीक मागतात. हा असा अभिनव प्रकार लक्षात घेता, नागरिक लगेच खिशात हात घालतात आणि हाती लागतील तेवढे पैसे देऊन टाकतात. काही ठिकाणी कार पुसून देण्यात येते, कारवर चढून भीक मागण्यात येते.
दोन दिवसांपूर्वी कोरोना बळींच्या संख्येत एका भिकार्‍याची भर पडली. त्यामुळे हा विषय आता ऐरणीवर आला असून आजवर याकडे दुर्लक्ष करणारे नागरिक आता हा प्रकार गांभीर्याने घेत आहेत. त्यामुळे तक्रारी देखील वाढल्या आहेत. लॉकडाऊन सुरू असताना चौकात पोलिस असत आणि कुणी बाहेर पडत नव्हते. आता दोन्ही बाबी मोकळ्या झाल्या असून दोन महिन्यांचा अनुशेष आता भरुन काढण्याकडे भिकार्‍यांचा कल वाढला आहे.
मूळात शहरातील सर्व भागातील भिकार्‍यांना अनेक स्वयंसेवी संस्थांनी धान्य, शिधा तसेच तयार अन्नाचा पुरवठा केला आणि अनेकांकडे किट देखील पोहोचल्या आहेत. त्यामुळे आजच्या घडीला कुणी भिकारी उपाशी िंकवा वंचित असल्याचे दिसत नाही.
मास्कमुळे भय वाढले
सध्या सर्वत्र मास्क अनिवार्य आहे. या भिकार्‍यांच्या तोंडाला देखील मास्क लागले आहेत पण हे मास्क अतिशय घाण आणि जुने दिसतात अनेकदा हे लोक रस्त्यावर तसेच कचराघरात पडलेले मास्क उचलताना दिसतात. त्यामुळे लागण होण्याची शक्यता वाढते आणि या प्रकारात स्पर्श केल्यास लागण निश्चित आहे.त्यामुळे प्रशासनाने याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.