अकोल्यात 24 कोरोना बाधितांची वाढ

    दिनांक :01-Jun-2020
|
-  दोघांचा मृत्यू

अकोला,
कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून आज अकोल्यात बाधितांच्या संख्येत 24 जणांची वाढ झाली आहे. अकोल्यात कोरोना विषाणुचा फटका आणखी दोन बाधित रूग्णांना बसला असून त्यांचा मृत्यू झाला आहे. परिणामी कोरोनामुळे जिल्ह्यात मरण पावलेल्यांची संख्या दोनने वाढली व मृतकांची एकूण संख्या 34 झाली आहे. त्यात एकाने आत्महत्या केल्याची बाब समाविष्ट आहे. तर जिल्ह्यात बाधितांची एकूण संख्या 605 झाली आहे.
 
corona_1  H x W
 
आज दिवसभरात सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोरोना संसर्ग तपासणीचे 107 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 83 अहवाल नकारात्मक तर 24 अहवाल बाधितचे आले आहेत. आज दुपारनंतर 10 जणांना सुट्टी देण्यात आली. दरम्यान रविवार 31 मे रोजी रात्री नागपूर येथे संदर्भित केलेल्या महिला रुग्णाचा तर आज दुपारी उपचार घेतांना अन्य महिला रुग्णाचा अशा दोन रुग्णांचा मृत्यू झाला.आज अखेर 129 बाधित रुग्ण उपचार घेत आहेत, तर 12 नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
 
 
आज 24 बाधित आढळले
आज सकाळी प्राप्त अहवालात 12 महिला व 12 पुरुष असे 24 जणांचे अहवाल बाधितचे आले आहेत. त्यात 5 जण रामदास पेठ येथील, 3 जण हरिहरपेठ येथील, 2 जण कमलानगर, 2 जण आंबेडकर नगर येथील तर उवरित खैर मोहम्मद प्लॉट, सिंधी कॅम्प, खदान, गुरुनानक नगर कौलखेड, रणपिसेनगर, मुजफ्फरनगर, अनिकट पोलिस लाईन, नुरानी मशीद जवळ खदान, खडकी, सरकारी गोदाम खडकी, भरतनगर व कोकणवाडी मूर्तिजापूर येथील रहिवासी आहेत. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
 
दोघांचा मृत्यू
आज दिवसभरात दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात एक मृत्यू काल रात्री इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे उपचारासाठी संदर्भित केलेल्या 58 वर्षिय महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान आज दुपारी उपचार घेतांना एका 55 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
 
 
10 जणांना सुट्टी
आज 1 जून रोजी दुपारी 10 जणांना सुट्टी देण्यात आली. त्यात तीन महिला व सात पुरुषांचा समावेश आहे. त्यातील 2 जण खदान येथील तर शिवाजी नगर, छोटी उमरी, शिवानी नगर वाशीम बायपास, खैर मोहम्मद प्लॉट, तेलीपुरा, माळीपुरा, राजपुतपुरा, नवाबपुरा येथील प्रत्येकी 1 रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.