14 खरीप पिकांच्या हमी भावात 50 ते 83 टक्के वाढ

    दिनांक :01-Jun-2020
|
- केंद्रीय मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली,
शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी 14 खरीप पिकांच्या किमान हमी भावात 50 ते 83 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रिंसह तोमर यांनी आज सोमवारी केली.
 
 
Nareendra sing_1 &nb
 
 
 पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषी क्षेत्राबाबत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती देताना तोमर म्हणाले की, 14 खरीप पिकांच्या किमान हमी भावाबाबत कृषी उत्पादन खर्च आणि मूल्य आयोगाने केलेल्या शिफारसी मान्य करण्यात आल्या. किमान हमी भाव उत्पादन खर्चाच्या दीडपट करण्याच्या आश्वासनाची सरकार पूर्तता करत आहे. त्यामुळे या 14 पिकांच्या किमान हमी भावात 50 टक्क्यापासून 83 टक्क्यापर्यंत वाढ करण्यात आली आहे. डॉ. स्वामीनाथन आयोगाने यासंदर्भात शिफारसी केल्या होत्या.
 
आता असे राहतील हमीभाव
पीक नवे भाव (रुपये प्रती क्विंटल)
धान 1868
ज्वारी 2620
बाजरी 2150 रुपये किमान हमी भाव मिळणार आहे. मक्याच्या किमान हमी भावात 53 टक्के, तर कापूस, शेंगदाणा, सूर्यफूल, तीळ, रागी आणि सोयाबीनच्या किमान हमी भावात प्रतिक्विंटल 50 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.
विक्रमी उत्पादन
देशात यावेळी धान्याचे प्रचंड उत्पादन झाले आहे, शेतकर्‍यांनी प्रचंड मेहनत घेत धान्याचे हे विक्रमी उत्पादन देशाला समर्पित केले आहे. आतापर्यंत 360 लाख मेट्रिक टन गव्हाची आणि 95 लाख मेट्रिक टन तांदळाची खरेदी करण्यात आली आहे. डाळी आणि तेलबियांची खरेदी सुरू आहे. मक्याच्या उत्पादनात 52 टक्क्याने वाढ झाली, असे तोमर म्हणाले.
 
कर्जफेडीची मुदत 31 ऑगस्ट
शेतकर्‍यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी असलेली मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. या दरम्यान कर्जाची परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना आता वार्षिक 4 टक्के दराने पुढील कर्ज मिळणार आहे.